देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 6, 2025
in परभणी
0
अशोक काकडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार
Please Share

मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्यावतीने नाशिक येथे गौरव

सेलू : जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक अण्णासाहेब काकडे यांना नाशिक येथील मराठवाडा सामाजिक फाउंडेशन या संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार शनिवारी (ता. ४) प्रदान करण्यात आला. नाशिक येथे झालेल्या समारंभात भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर नाशिक भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. अशोक काकडे यांचे शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक पर्यावरण, आरोग्य, पाणी, कृषी, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये श्री केशवराज फेस्टिवल, दिवाळी पहाट, यासह वेगवेगळे उपक्रम सेलू शहर आणि तालुका भरात राबविण्यात येतात, सामाजिक क्षेत्रात विविध महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने वर्षभर संस्थेच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात येतात. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सेलु शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना ‘सन्मान कर्तृत्वाचा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या उपक्रमांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करियर मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थी पालक मिळावे इत्यादी कार्यक्रम अशोक काकडे यांच्या मार्फत घेतले जातात. आरोग्य क्षेत्रात अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मदत केंद्र कार्यरत असून या केंद्राच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले जाते. त्याचबरोबर सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येते. नुकतेच सेलू येथे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रील २०२५ रोजी तालुकास्तरीय सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित केले होते. यात दहा हजार चारशे रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत. तालुक्यातील कुपटा जिल्हा परिषद गटातील श्री क्षेत्र हट्टा गावातील ५००० नागरिकांची नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत औषधी आणि चष्म्याचे वाटप करण्यात आले होते. धार्मिक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील संत महात्म्यांचे कीर्तन आणि प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीण भागात पाणी आडवा पाणी जिरवा, कोल्हापुरी बंधारे, आदी उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. सेलू शहर आणि तालुक्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी काकडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाते. दरवर्षी दिव्यांगांचा मेळावा घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम करण्यात येते. बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने श्री काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर, शेतकऱ्यांच्या काम केले जाते. महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जाते. महिलांच्यासाठी धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची स्थापना करून महिलांना सूक्ष्म वित्त पुरवठा करून वित्तीय साक्षरता आणि महिलांचे सक्षमीकरणाचे काम केले जाते. या कामाची दखल घेऊन नाशिक येथील मराठवाडा सामाजिक फाउंडेशन च्या वतीने सन २०२५ चा ‘मराठवाडा भूषण’ हा पुरस्कार श्री काकडे यांना नाशिक येथे देण्यात आला.

Post Views: 1,322
Please Share
Previous Post

लेखाधिकारी वैजनाथ जाधव यांचा सेवागौरव

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ