देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण

admin by admin
July 31, 2025
in परभणी
0
गंगाखेड येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण
Please Share

परभणी : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर व सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे सहायक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार यांच्यामार्फत देण्यात आले. त्यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) अशोक केंद्रे उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मतदार यादीचे कामकाज चांगले पार पाडल्याबद्दल सर्व बीएलओ व पर्यवेक्षक यांचे कौतुक करून प्रातिनिधिक स्वरूपात ई. बी. नागरगोजे, यु. टी. सुरनर, आर. एफ. राठोड, मेहरबान पवार, सुधीर गायकवाड, संतोष फड यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीस डापकर यांनी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये नवमतदारांची नोंदणी करणे, मृत/कायम स्थलांतरितांची वगळणी करणे व मतदारांच्या तपशीलातील दुरुस्त्या करायच्या असल्याचे सांगितले. तसेच १२०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करावयाचे असल्याची माहिती दिली. त्यासोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व निर्वाचक गणातील मतदार यादी विभाजनाचे काम करण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत सूचना दिल्या.

प्रशिक्षणादरम्यान मतदार याद्यांचे संविधानिक तरतुदी, मतदार कोण असावा, बीएलओ नियुक्ती आणि जबाबदारी व कर्तव्य याची माहिती देण्यात आली. बीएलओ यांच्या घरोघरी सर्वेक्षण भेटीदरम्यान वेशभूषा आणि शिष्टाचार कसा असावा, भेटीदरम्यान बीएलओ यांनी विचारायचे प्रश्न, नवमतदारांची नोंदणी, मृत/स्थलांतरित वगळणी व मतदारांच्या तपशिलातील दुरुस्त्या करण्यासाठी कोणत्या प्रकारचे फॉर्म क्रमांक ६, ६अ, ७, ८ व कागदपत्रे विचारात घेऊन मतदार यादी कशा प्रकारे अद्ययावत करावयाचे याबाबत माहिती देण्यात आली. बीएलओ यांना घरोघरी भेटीदरम्यान निर्माण होणाऱ्या विविध परिस्थितीचे प्रासंगिक उदाहरणांसह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच व्होटर हेल्पलाईन ॲपची माहिती देण्यात आली. त्यावेळी निवडणूक विभागातील सहायक महसूल अधिकारी विशाल गाजरे, महसूल सहायक राफे अन्सारी, प्राथमिक शिक्षक किशोर मस्के, संगणक चालक प्रेम गोडबोले आदींनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post Views: 1,223
Please Share
Previous Post

विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला

admin

admin

Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ