देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2025
in परभणी
0
ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
Please Share

नीट, जेईई आणि सीईटी फाऊंडेशन परभणी येथे ध्वजारोहण कार्यक्रम

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या नीट, जेईई आणि सीईटी फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिकरित्या ‘महाराष्ट्र गीत’ सादर करण्यात आले. गौरी धामनकर आणि आरुषी कोटे या विद्यार्थिनींनी संविधान, तर गायत्री लाटे आणि रोहिणी हारकळ यांनी प्रतिज्ञा सादर केली. सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले, तर प्रणिता वरकड, आराध्या राजुरे आणि इशिता राजुरे यांनी भाषणे दिली. अधीक्षक शिक्षक झोडपे यांनी देशभक्तीपर गीत गायले.या कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव प्रा. शीतल सोनटक्के, समन्वयक आर. जी. पोले, विभागप्रमुख शिंदे, इतबारे, धुळे, परडे, पवार, महिपाल आणि घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईड पथकाने पथसंचलन करून तिरंग्याला मानवंदना दिली. संस्थेच्या सचिव प्रा. शीतल सोनटक्के यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते व नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘पसायदान’ आणि ‘महाराष्ट्र गीत’ गाऊन झाली. कार्यक्रमाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बळीराजा सन्मान योजना शैक्षणिक संकुलात ध्वजारोहण

ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित बळीराजा सन्मान योजना या शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के आणि संस्थेच्या सचिव प्रा. शीतल सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात समन्वयक राजुरे, शेळके, डाढाळे, भोपळे, सिद्धेवाड, वरकड आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर ‘महाराष्ट्र गीत’, ‘संविधान’ आणि ‘प्रतिज्ञा’ सामूहिक स्वरूपात घेण्यात आली. भक्ती पोले आणि शिवम डाके या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,273
Please Share
Previous Post

सेलूच्या गजानन ॲग्रो इंडस्ट्रीला उत्कृष्ट उद्योगाचा जिल्हा पुरस्कार

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूर्णा तालुक्यातील नुकसानीची पाहणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूर्णा तालुक्यातील नुकसानीची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूर्णा तालुक्यातील नुकसानीची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ