देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 21, 2026
in परभणी
0
मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करा
Please Share

सेलू तालुका दबाव गटाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

सेलू : परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्न दुधना नदीवर मोरेगावजवळ बंधारा आहे. सदर बंधारा परिसरातील १५ ते २० गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा करतो. या बंधाऱ्यात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने दडी मारल्याने भविष्यात नवीन पाणी साठवणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करावेत अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जर पुढे पाऊस पडलाच नाही, तर या बंधाऱ्यातून ज्या १५ ते २० खेड्यांना पाणीपुरवठा होतो, तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. परिणामी तीव्र पाणीटंचाई आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या या बंधाऱ्याचे दरवाजे काढून ठेवल्यामुळे पाण्याचा साठा सातत्याने कमी होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता जनावरांसाठी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सदर बंधाऱ्यात पाणी साठवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र संबंधित अधिकारी या आवश्यक बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हे निवेदन सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ यांच्यासह ॲड. रामेश्वर शेवाळे, ॲड. देवराव दळवे, मुकुंद टेकाळे, आबासाहेब भुजबळ, सतिश काकडे, ॲड. योगेश सुर्यवंशी, लक्ष्मण प्रधान, योगेश काकडे, अक्षय बुरे, प्रकाश शिंदे, महादेव डोईफोडे, राजेंद्र केवारे, अजित मंडलिक, रौफ भाई, रामचंद्र कांबळे, गणेश सोळंके, ज्ञानेश्वर शेवडे, ॲड. उमेश काष्टे, दिलीप शेवाळे, दत्ता कांगणे, भारत रवंदळे आदींच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

Post Views: 1,340
Please Share
Previous Post

बालमनाचा ठाव घेते तेच खरे बालसाहित्य : कविवर्य इंद्रजित भालेराव

Next Post

‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ चा जागर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ चा जागर

'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' चा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ