देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिप सभागृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 11, 2025
in परभणी
0
जिप सभागृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Please Share

जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी : जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणारी एक महत्त्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण ९ ऑक्टोबररोजी पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महानगर पालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक स्मिता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी. एस. उडाणशिवे उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या दूर करून चांगल्या सोई-सुविधा दिल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत लोकांना देण्याचे काम केले जाते. परभणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी उत्कृष्ट काम केले आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षणाचे काम उल्लेखणीय केले आहे. परभणी जिल्हा परिषदेने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये चांगले काम केले असून १५० दिवसाच्या कार्यक्रमातूनही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सुरु असून परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळण्यासाठी सर्वांनी चांगले काम करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे आयोजित उडाण-२०२५ या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अंगणवाडी सेविका वत्सला काळुराम भारशंकर, आघाव वाडी ता. जिंतूर, आशा पुरभाजी झुंझारे, आडगांव ता. जितूंर तसेच रॉकेट लर्निंग जिल्हा समन्वयक सोमनाथ चिंचकर यांचा सत्कार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत जनतेपर्यंत पोहचविल्या जावून ग्रामीण जनतेचा विकास करण्याचे मोलाचे कार्य जिल्हा परिषदेमार्फत केले जाते. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, जिल्हा परिषदेचे सभागृह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले असून हे सभागृह निश्चितच उपयोगी ठरणार आहे. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी प्रास्ताविकेतून जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आहे जिल्हा परिषदेचे सभागृह : जिल्हा परिषद सदस्यांची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच वेगवेगळ्या विषय समिती सभा आयोजित करण्याकरिता जिल्हा परिषदेमध्ये नूतन सभागृह तयार करण्यात आले आहे. या सभागृहाचे एकूण आसन क्षमता जवळपास १५० इतकी असून यात १ प्रोजेक्टर, ७ इंटरनेट कनेक्टेड टेलिव्हिजन सेट, ८० मायक्रोफोन पॉइंट व २२ टन एअर कंडिशनिंग कार्यान्वित करण्यात आले आहे.

Post Views: 1,323
Please Share
Previous Post

क्युरिऑसिटी सायन्स सेंटरचे आज भूमिपूजन

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी कुलगुरूंचा थेट संवाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी कुलगुरूंचा थेट संवाद

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी कुलगुरूंचा थेट संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ