खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य राखणे शक्य : मुख्याध्यापक धनंजय भागवत
सेलू : येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धनंजय भागवत होते, तर क्रीडा शिक्षक रामेश्वर कदम आणि संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, खेळाच्या माध्यमातून ते उत्तमरीत्या राखता येते; त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दैनंदिन जीवनात खेळांना महत्त्व दिले पाहिजे, असे विचार मुख्याध्यापक धनंजय भागवत यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. याप्रसंगी संतोष कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक रामेश्वर कदम यांनी केले. सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर यांनी केले, तर संगमनाथ रोंटेवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.





