सेलूतील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे आयोजन
पाथरी : आषाढी एकादशी निमित्त येथील ओंकार वृद्धाश्रम येथे सामाजिक बांधिलकी जपत फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समिती सेलू तर्फे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.मागील अनेक वर्षापासून समिती तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावेळी समितीचे नागेश ठाकूर, ओमकार जयस्वाल, इंद्रजीत ठाकूर, संतोष नोकवाल, रितेश शेडुते, ओम गायकवाड, जतीन काकडे व समिती सदस्य उपस्थित होते.





