देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उत्कर्ष विद्यालयाच्या दिंडीने वेधले लक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
उत्कर्ष विद्यालयाच्या दिंडीने वेधले लक्ष
Please Share

आषाढी एकादशी निमित्त आयोजन

सेलू :‌श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्देशाने आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे भव्य व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. यावेळी रामरावजी रोडगे, डॉ. सविता रोडगे, आदित्य रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे (पारवे), मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे आणि सौ. ज्योती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.उत्कर्ष विद्यालयातून दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर सेलू चौक, मठ गल्ली, सेलू बसस्थानक मार्गे पुन्हा विद्यालयात दिंडीचे आगमन झाले. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, आकर्षक समूहनृत्य, भावस्पर्शी अभंग, प्रबोधनात्मक भारूड, मनमोहक गवळणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ आणि संत जनाबाई यांच्या वेशभूषा साकारून संतपरंपरेचा प्रभावी संदेश दिला. या सांस्कृतिक सादरीकरणातून भक्ती, समता, सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान, शिस्त, भक्तीभाव आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होते, असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे नृत्यदिग्दर्शक श्री. प्रफुल सर, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरला.

Post Views: 1,452
Please Share
Previous Post

आषाढी एकादशीनिमित्त ओंकार वृद्धाश्रम मध्ये कार्यक्रम

Next Post

वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ