देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 5, 2025
in महाराष्ट्र, शेक्षणिक
0
प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण
Please Share

तालुका, जिल्हा स्तरावर शिक्षकांच्या समित्या करणार सहामाही आणि वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार

मुंबई : शालेय शिक्षणात इयत्ता पहिली ते बारावी या स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत २०१० नंतर पहिल्यांदाच बदल होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) सुधारित मूल्यमापन धोरण तयार करत आहे. हे नवीन धोरण तयार होईपर्यंत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आता प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या शिक्षकांची समिती आता तालुका आणि जिल्हा स्तरावर नेमली जाईल. ही समिती संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यासाठी सहामाही आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका तयार करेल. याबाबतचे वृत्त ४ ऑक्टोबररोजी महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार,

प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता आणण्याचा उद्देश : इयत्ता आठवीपर्यंत बोर्डाची कोणतीही परीक्षा न घेण्याच्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागाने २०१० मध्ये सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली होती. यानुसार प्रत्येक शाळेतील शिक्षकांना विषयनिहाय, वर्गनिहाय संकलित मूल्यमापन करणे आवश्यक होते आणि याचे वेळापत्रकही शाळा पातळीवर ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. पण या पद्धतीमुळे प्रश्नपत्रिकांच्या काठिण्यपातळीत प्रचंड तफावत आढळून आली. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये नाही, तरी निदान तालुका आणि जिल्हा स्तरावर तरी मूल्यमापन प्रक्रियेत सुसूत्रता असावी, या उद्देशाने आता नवीन धोरण आखले जात आहे.

शिक्षकांच्या समित्यांचे स्वरूप
नवीन धोरणानुसार, तालुकास्तरीय समिती : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध विषयांत पारंगत असलेले दहा ते पंधरा शिक्षक निवडून त्यांची ही समिती स्थापन केली जाईल. ही समिती चाचणी आणि सहामाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करेल. जिल्हास्तरीय समिती : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे जिल्हास्तरावर एक समिती स्थापन होईल. ही समिती वार्षिक परीक्षेच्या मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका तयार करेल.

विशेष म्हणजे, एका तालुक्यात किंवा जिल्ह्यात तयार झालेल्या या प्रश्नपत्रिका दुसऱ्याच तालुक्यात किंवा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी पाठवल्या जातील. यामुळे संबंधित शिक्षकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकांचा फायदा घेण्याचा प्रकार घडणार नाही, असे या पत्रकात स्पष्ट नमूद केले आहे.

Post Views: 1,249
Please Share
Previous Post

जिंतुरात रविवारी रंगणार ‘ काव्यजागर ‘

Next Post

१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

१४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव, बँड पथक, सजावटीसाठी मंडळांची तयारी सुरू, १९ दिवस उशिराने आगमन, १२ दिवस मुक्काम वाशिम : हिंदू...

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू, जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत देशनिष्ठ , प्रतिनिधी, वाशिम : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक...

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

कायद्याच्या अंमलबजावणीसोबत जनजागृती, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्तरावरील सतर्कता महत्त्वाची फुलचंद भगत, वाशिम बालविवाह ही केवळ सामाजिक प्रथा नसून बालकांच्या शिक्षण,...

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मंगरुळपीर शहरातील घटना वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ