देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

राजस्थान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 23, 2026
in वाशिम
0
राजस्थान महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
Please Share

फुलचंद भगत, वाशिम : स्थानिक राजस्थान महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,Microbilogist’s Society of India आणि MASMO Care Multi-Speciality Chikitsalaya, Nagpur यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी MASMO CareMulti-Speciality Chikitsalaya, Nagpur चे डॉ. मनोज झाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपसथित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश झंवर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन,वजन, उंची,बीएमआय तसेच आवश्यकतेनुसार इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.तपासणी दरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत डॉक्टरांनी योग्य सल्ला व मार्गदर्शन केले.आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये माणसात वाढणारा ताण,अपुरी झोप, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबतही डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.नियमित व्यायाम, संतुलित आहार,पुरेशी झोप, वैयक्तिक स्वच्छता आणि सकारात्मक विचारसरणी यांचे निरोगी जीवनासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले.यावेळी उपस्थितांनी डॉक्टरांशी संवाद साधून विविध आरोग्यविषयक प्रश्न विचारले. डॉक्टरांनी सर्व शंकांचे निरसन करून आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे किती आवश्यक आहे, याबाबत माहिती दिली. त्यामुळे सगळ्यांना आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली.प्रमुख पाहुणे डॉ.मनोज झाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, “निरोगी शरीर आणि निरोगी मन हे मानवाच्या यशस्वी भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांमुळे आपल्याला आरोग्याची नियमित तपासणी करण्याची सवय लागते, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमप्रकाश झंवर यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महाविद्यालयातील शिक्षकांनी बोद्धिकदृष्ठ्या तथा शारीरिक व मानसिक सक्षम असावे.भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 105 प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.रचना पचोरी ह्या शिबिराच्या समनवयक होत्या.तसेच प्रा.पृथ्वीराज सदार आणि डॉ.आनंद पांडे हे आयोजक होते. शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित डॉक्टर, वैद्यकीय पथक, मान्यवर,प्राध्यापक व कर्मचारी यांचे शिबिराचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने राजस्थान महाविद्यालयाने आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर अत्यंत उपयुक्त व कौतुकास्पद ठरले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजस्थान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ठाकूरदास मालानी,माजी अध्यक्षा शिलाताई राठी तथा सचिव सुधीर राठी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post Views: 1,308
Please Share
Previous Post

अध्यक्षपदी सारिका हेडगे, ओम कानडे सचिव

Next Post

राष्ट्रपती भवनात गोंधळ लोककलेचा जागर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रपती भवनात गोंधळ लोककलेचा जागर

राष्ट्रपती भवनात गोंधळ लोककलेचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ