नांदेड वरिष्ठ मंडळ प्रबंधक अभय कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
परभणी : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे मुख्य प्रबंधक एस. एल. पोपुलवार हे ३६ वर्षे १० महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून २०२६ रोजी मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्ताने परभणी शाखेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ व २९ जून २०२६ रोजी श्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे मुख्य प्रबंधक गणेश धाग होते. प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक अभय कुलकर्णी, नांदेडचे विपणन प्रबंधक रवी वर्मा दाटला, नांदेडचे विपणन प्रबंधक डी. रामचंदर व सहाय्यक विभाग व्यवस्थापक प्रकाश दीक्षित उपस्थित होते. याप्रसंगी वरिष्ठ मंडळ प्रबंधक अभय कुलकर्णी, विपणन प्रबंधक रवी वर्मा दाटला, सहाय्यक विभाग व्यवस्थापक प्रकाश दीक्षित, मुख्य प्रबंधक एस. एल. पोपुलवार तसेच पंडित लोकडे, संतोष शिंदे, भास्कर हिप्परगे, संपत कपाळे, अनिल शेळके, गिरीश देशपांडे व काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमादरम्यान विमा कामगार संघटना नांदेड विभागाचे अध्यक्ष कॉम. शमशोदिन शेख यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच एन.ओ.आय.डब्ल्यू. व एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशन परभणी शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ गाडगे, व्यास, जाकेर शेख, संतोष कोडगिरकर, किरण गुंडेकर, रमेश दांडगे, शिवसांब समशेटे, माधव वाघ, संदीप चंद्रवंशी, सुनील पेडगावकर, किरण कुलथे, विठ्ठल कदम, सलीम शेख व फेरोज सिद्दीकी आदिंनी परिश्रम घेतले. दादाराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी महामंडळाचे कर्मचारी, अधिकारी, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी व आयुर्विमा महामंडळाचे पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





