अन्नामृत फाऊंडेशनच्या स्वयंपाकघराला शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट
देशनिष्ठ प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : येथील अन्नामृत फाऊंडेशनने आता पोषण आहारात गव्हाची पोळी देण्याचे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी, ७ ऑगस्टरोजी नारेगाव येथील अन्नामृत फाऊंडेशनच्या स्वयंपाकघराला भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.
राज्यभरात हा उपक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.शहरातील ३६ हजार विद्यार्थ्यांनायाचा लाभ देण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या सहा ते आठ हजार विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा सध्या पोषण आहारात पोळी दिली जाते.भोयर यांनी टोफूपनीर कटिंगमध्ये सहभाग घेतला. प्रायोगिक तत्त्वावर पोषण आहारासोबत चपाती उपक्रमाची माहिती घेतली. महापालिकेच्या नारेगाव शाळेतील विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. महाराष्ट्रातील मेन्यूमध्ये गव्हापासून तयार होणारी पोळी, दलिया (गोड व तिखट) याचा अंतर्भाव करावा, अशी मागणी भोयर यांच्याकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेण्याचे सकारात्मक निर्णय आश्वासन भोयर यांनी दिले.





