देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 6, 2025
in परभणी
0
सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान
Please Share

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व गायकवाड मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम

सेलू : शिक्षक दिनानिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या वतीने शहरातील १०१ गुरुजनांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या कै. वसंतराव खारकर सभागृहात हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपस्तंभ प्रतिष्ठानचे सेलू तालुका अध्यक्ष माधव लोकुलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, कन्या सेलूचे केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, सेवानिवृत्त अधिकारी अतुल दातार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अमोल निकम, भाजपचे तालुका अध्यक्ष गणेशराव काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, संयोजक प्रशांतसिंह प्रकाशसिंग रघुवंशी (ठाकूर), राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. मुकुंद गजमल, आयोजक सुनील गायकवाड आणि देवेंद्र कुरा उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रेरणास्थान कै. दत्तात्रय हेलसकर, साने गुरुजी आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यात शहरातील व तालुक्यातील विविध शाळांमधील १०१ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. दीपस्तंभ प्रतिष्ठान सेलू व पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सन्मानित केलेल्या २० शिक्षकांचा, तसेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवरे यांचा शाल, हार, पेन आणि मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बजरंग गिल्डा यांनी आयोजक सुनील गायकवाड यांचे अभिनंदन केले. ‘शहरात अनेक सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, पण शिक्षकांवर प्रेम व्यक्त करणारे एकमेव सुनील गायकवाड आहेत,’ असे गौरवपर उद्गार त्यांनी काढले. तसेच, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे ॲड. मुकुंद गजमल आणि संयोजक प्रशांतसिंह प्रकाशसिंग ठाकूर यांचेही त्यांनी अभिनंदन केले.केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, अतुल दातार आणि अध्यक्ष माधव लोकुलवार यांनीही मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षी यापेक्षाही मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी संयोजक आणि आयोजकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनील गायकवाड यांनी केले. ते म्हणाले, ‘आपण शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला पाहिजे. शिक्षक हे एक असे पद आहे जे सर्व अधिकारी घडवतात. यापुढेही हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेणार आहे.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवरे यांनी केले, तर ॲड. मुकुंद गजमल यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र कुरा, श्याम मुंढे, बाबासाहेब बदाले, अण्णासाहेब गायकवाड, रामप्रसाद बोराडे, शुकाचार्य शिंदे, यशराज गायकवाड, श्याम मचाले, पांडुरंग पाटणकर, सुशील तोगरे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post Views: 1,320
Please Share
Previous Post

सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान

Next Post

शिवा संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिवा संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

शिवा संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ