देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2025
in परभणी, मराठवाडा, शेक्षणिक
0
श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव
Please Share

शिक्षकांना विविध पुरस्कार, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी, ४ सप्टेंबररोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा भव्य सोहळा दुपारी १:३० वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान करण्यात आला. ‘शिक्षणामध्ये अपेक्षित असलेले आवश्यक बदल’ या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी भूषवले. यावेळी सचिव डॉ. सविता रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक आणि राज्य आदर्श पुरस्कार विजेते रोहिदास वायाळ, पी. एम. श्री जिल्हा परिषद शाळा, डासाळाचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे, अमोल निकम, विकास मुपडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

या सोहळ्यात श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व संस्थांमधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू; प्रॉस्परस पब्लिक स्कूल, सेलू; उत्कर्ष विद्यालय, सेलू; ज्ञानतीर्थ विद्यालय, सेलू; क्युरियस किड्स, जिज्ञासा बालविहार, फिन किड्स; आदित्य फार्मसी कॉलेज, सेलू; अपूर्वा पॉलिटेक्निक, सेलू; आदित्य ज्युनियर कॉलेज, वालूर; आणि डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू येथील शिक्षकांचा समावेश होता. या शिक्षकांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरविण्यात आले.

डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षक हा समाजाचा कणा आहे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. श्रीराम प्रतिष्ठान नेहमीच शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी कटिबद्ध आहे.” रोहिदास वायाळ यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, “शिक्षक केवळ ज्ञानच देत नाहीत, तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. या पुरस्कारांमुळे शिक्षकांचा उत्साह आणि प्रेरणा वाढेल.” मधुकर काष्टे यांनी शिक्षणातील नावीन्य आणि समर्पण यावर भर दिला. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रत्नपारखी यांनी केले, तर संदीप आकात, डिगांबर टाके आणि कल्पना भाबट यांनी सूत्रसंचालन केले.

आदर्श शिक्षक पुरस्कार

  • आदर्श शिक्षक पुरस्कार: मधुकर रामभाऊ काष्टे, केंद्रीय प्राथमिक शाळा, डासाळा
  • उपक्रमशील शिक्षक पुरस्कार: अमोल सोपानराव निकम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिग्रस खुर्द
  • नाविन्यपूर्ण शिक्षक पुरस्कार: मल्लिकार्जुन नागप्पा देवरे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, लिंबा, पाथरी

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा विजेते

  • प्रथम: विकास सुरेशराव मुपडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी
  • द्वितीय: शुभम नारायण झोल, प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू
  • तृतीय: रेश्मा अशोक चौगुले, प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू

Post Views: 1,253
Please Share
Previous Post

आरक्षण वाचवण्यासाठी सकल ओबीसींचे आंदोलन

Next Post

सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान

सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ