सेलू : येथील क्रांती चौकात जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट, २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलिंदजी सावंत यांच्या हस्ते क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि हक्कांबाबत प्रा. परसराम कपाटे यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रा. परसराम कपाटे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष गंगाधर वानोळे, राजाराम काळे, सूर्यभान पवार, रंगनाथ काळे, भारत पवार, भारत चिभडे, मनोहर चिभडे, लक्ष्मण तायवाडे, विष्णू पवार, सुनील काळे, प्रवीण काळे, किशोर काळे, कैलास काळे, विनोद काळे, विनोद पवार, बाळू काळे, राधेश्याम इंगोले, कृष्णा तावरे, मंगला काळे, सुमन पवार, कोमल काळे, आरती पवार, शांताबाई काळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




