सेलू जि.परभणी : सेलू पंचायत समितीच्या सभापतीपदी कुपटा गणातून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयमाला ग्यानोजी डोंबे तर उपसभापतीपदी बोरकिणी गणातून निवडून आलेल्या सुलभाबाई ज्ञानोबा घुगे यांची मंगळवारी, १० मार्च रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिले पाहिले. निवड प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, पप्पू डोंबे, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, डॉ.अशिष डख, संजय साडेगावकर, नगराध्यक्ष मिलिंद सांवत, अनिल पवार आदींसह भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...