देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रास वापर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 3, 2026
in परभणी
0
फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रास वापर
Please Share

लोकांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा, सेलूमध्ये श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानची निवेदनाद्वारे मागणी, आंदोलनाचाही इशारा

सेलू : येथील बाजारपेठेत आंबे व इतर फळे कॅल्शियम कार्बाइड तसेच इतर घातक रसायनांचा वापर करून पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून लोकांच्या जिवाबरोबर चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सेलूचे उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांच्याकडे ३ जून रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात प्रतिष्ठानने म्हटले आहे की, रासायनिक पद्धतीने पिकवलेली ही फळे खाल्ल्याने नागरिकांना तोंडात येणे, उलट्या होणे, जुलाब होणे आणि पोट दुखणे अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर यामुळे कॅन्सरसारख्या अत्यंत गंभीर आजारांचा धोकाही निर्माण झाला आहे. व्यापारी लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळत आहेत. भारतीय अन्न व औषध प्रशासनाच्या मानकांचा विचार केला तर कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून फळे पिकवण्यावर पूर्णपणे बंदी असून हा एक गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही शहरात सर्रासपणे या केमिकलचा वापर केला जात आहे.या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हा चाललेला खेळ न थांबल्यास श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. हे निवेदन देतेवेळी जयसिंग शेळके, अनुप कान्हेकर, विनोद धापसे, गणेश शेवाळे, रवि लांडगे, संदीप पाजगे आणि सागर गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 1,697
Please Share
Previous Post

गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

Next Post

महिलांच्या सन्मानबाबत आत्मपरीक्षण गरजेचे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महिलांच्या सन्मानबाबत आत्मपरीक्षण गरजेचे

महिलांच्या सन्मानबाबत आत्मपरीक्षण गरजेचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ