देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 4, 2026
in परभणी
0
सेलू एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे
Please Share

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी

परभणी : सेलू परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सेलू येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात सेलू येथील नगराध्यक्ष मिलिंद सावंत, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना ४ जून २०२६ रोजी एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची उपस्थिती होती.या निवेदनात सेलू येथे एमआयडीसी उभारणीची थांबलेली प्रक्रिया तात्काळ सुरू करून त्याला मंजुरी देण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. सेलू आणि सभोवतालच्या परिसराची लोकसंख्या जवळपास १ लाखावर आहे. लोअर दुधना प्रकल्पामुळे विस्थापित झालेले अनेक नागरिक सेलू शहरात आणि लगतच्या वसाहतींमध्ये वास्तव्यास आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आणि रोजगाराचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे येथे एमआयडीसी झाल्यास या विस्थापित कुटुंबांमधील तरुणांना तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

यापूर्वी सेलू येथील हादगाव (खुर्द), वाकी आणि रवळगाव या तीन गावांमधील जमीन संपादित करून एमआयडीसी उभारण्यासाठी जमीन मोजणी व इतर प्रशासकीय प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र, काही कारणास्तव मध्यंतरी ही जमीन संपादन प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ही प्रक्रिया पुन्हा सुरू करून गतिमान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे.सेलू परिसरामध्ये एमआयडीसी उभारणे अत्यंत सोयीचे आहे, कारण लोअर दुधना धरणामुळे उद्योगांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच, परिसरात असलेल्या १३२ केव्ही उपकेंद्रामुळे अखंडित वीज पुरवठ्याची सोय आधीपासूनच उपलब्ध आहे. यासोबतच, समृद्धी महामार्गाच्या सान्निध्यामुळे वाहतूक आणि दळणवळण अत्यंत सुलभ व वेगवान होणार असल्याने उद्योगांच्या वाढीला मोठी चालना मिळणार आहे.या निवेदनावर सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद खारकर, मनीष कदम, संजय साडेगावकर, भाऊ सोनवणे, सुबोध काकडे आदींच्या सह्या आहेत.

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पाहाता, उद्योगमंत्र्यांनी यात स्वतः पुढाकार घेऊन प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी आता सेलूकरांमधून होत आहे.

Post Views: 1,601
Please Share
Previous Post

सेलू तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात

Next Post

मोरेगाव-वालूर रस्ता कामाची चौकशी करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोरेगाव-वालूर रस्ता कामाची चौकशी करा

मोरेगाव-वालूर रस्ता कामाची चौकशी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ