देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
in परभणी
0
किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन
Please Share

एसकेएमचे राष्ट्रपतींना मागण्यांचे पत्र

परभणी : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि केंद्रीय ट्रेड युनियनच्या आवाहनावरून १० ऑगस्ट २०२६ रोजी भारत छोडो आंदोलनाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभर ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

देशभरातील गावे, पंचायती, तालुके आणि शहरांमधून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.दिल्ली सीमेवरील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने ९ डिसेंबर २०२१ रोजी एमएसपी, कर्जमाफी, विजेचे खासगीकरण आणि गुन्हे मागे घेण्याबाबत दिलेली लेखी आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे.प्रमुख मागण्यांमध्ये भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार आणि कृषी मालाच्या मुक्त आयातीला विरोध करण्यात आला आहे. सर्व पिकांना C२+५०% नुसार किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी आणि पूर्ण शासकीय खरेदीची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई आणि पुनर्वसन देण्याची मागणी आहे.याशिवाय चार कामगार संहिता रद्द करून कामगारांना दरमहा ४२,००० रुपये किमान वेतन, मनरेगाअंतर्गत वर्षाला २०० दिवस काम आणि ७०० रुपये रोजंदारीची मागणी करण्यात आली आहे. वीज खासगीकरण विधेयक २०२५, बियाणे विधेयक २०२५ मागे घेणे, एफसीआयचे बळकटीकरण आणि खतांच्या तुटवड्यावर नियंत्रण मिळवण्याची विनंती करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना १०,००० रुपये मासिक पेन्शन, तसेच शिक्षण व संशोधनासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post Views: 1,461
Please Share
Previous Post

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

Next Post

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ