देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अकरा महिन्यांच्या मुलीसह पत्नी बेपत्ता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2026
in परभणी
0
अकरा महिन्यांच्या मुलीसह पत्नी बेपत्ता
Please Share

सेलू पोलिसांत पतीची तक्रार; गुगळी धामणगाव येथील घटना;

सेलू | प्रतिनिधी : तालुक्यातील गुगळी धामनगाव येथून २१ वर्षीय महिला आपल्या ११ महिन्यांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी महिलेचे पती विठ्ठल काळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती विठ्ठल काळे (वय २१, व्यवसाय घरकाम, रा. गुगळी धामणगाव) ही महिला १२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या ११ महिन्यांच्या मुलगी नंदिनी हिला सोबत घेऊन घरातून कोणासही काही न सांगता निघून गेली. त्यावेळी तिचे पती व सासू शेतातील कामासाठी बाहेर गेले होते.सायंकाळी पती घरी परतल्यानंतर घराला कडी लावलेली आढळून आली. त्यांनी शेजारी तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र आरती व मुलगी नंदिनी यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. सर्वांनी शोध घेतल्यानंतरही दोघींचा ठावठिकाणा न लागल्याने सेलू पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली.

बेपत्ता आरती काळे हिचा रंग गोरा, उंची सुमारे पाच फूट, शरीरयष्टी मध्यम, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे मध्यम व केस काळे आहेत. ती बेपत्ता होताना चॉकलेटी रंगाची साडी व ब्लाउज परिधान केले असून पायात काळ्या रंगाची चप्पल होती. तिला मराठी भाषा येते असून ती सहावीपर्यंत शिक्षित आहे. तिच्यासोबत ११ महिन्यांची मुलगी नंदिनी आहे.

याप्रकरणी सेलू पोलिसांनी बेपत्ता महिलेचा व तिच्या मुलीचा शोध सुरू केला आहे. दोघींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास सेलू पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,498
Please Share
Previous Post

संत तुकाराम विद्यालयात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

Next Post

‘भुरा’ माणसातील आत्मभान जागवणारे आत्मकथन : दादासाहेब बोंबले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘भुरा’ माणसातील आत्मभान जागवणारे आत्मकथन : दादासाहेब बोंबले

'भुरा' माणसातील आत्मभान जागवणारे आत्मकथन : दादासाहेब बोंबले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ