स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाचा ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम
सेलू : लेखक शरद बाविस्कर यांचा खानदेशातील ग्रामीण भागातून सुरू झालेला जीवनप्रवास ते जेएनयू दिल्लीपर्यंतचा खडतर प्रवास वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. ‘भुरा’ म्हणजे माणसातील आत्मभान जागवणारे आत्मकथन असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत ४३ वे पुष्प गुंफताना दादासाहेब बोंबले यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अभावाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी वाट दाखवण्याचे काम ‘भुरा’ या आत्मकथनातून घडले आहे.यावेळी ‘इन्व्हेस्ट इन परभणी’ या उपक्रमातील सहभागाबद्दल वसुधा महेशराव खारकर यांचा, गझल साफल्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गझलकार संजय विटेकर यांचा, तसेच प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थिनी निदा शेख व नूतन महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम उंडे यांचा मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’मध्ये लेख प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी निदा शेख हिने ‘भुरा’ आत्मकथनाविषयी आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी उदय जाधव होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयडॉल टीचर माधव गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन शाम पवार यांनी केले, तर आभार बाळू बुधवंत यांनी मानले.या कार्यक्रमास गंगाधर गुंजकर, अजित मंडलिक, ए. टी. देशमुख, उमेश खारकर, दत्ता श्रावणे, प्रल्हाद लेंगुळे, सच्चिदानंद डाखोरे, दीपक दलाल, मकरंद बोठे, सिद्धी पवार, अमोल बिडवे, राधेश्याम डख, सुनील रणखांब, राम गायकवाड, प्रमोद देशमुख, माणिक पडुळे यांच्यासह वाचक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...