देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विकासासाठी भाजपाला बळ द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
विकासासाठी भाजपाला बळ द्या
Please Share

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे आवाहन

सेलू : सेलू शहर, परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मनापासून बळ द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ भाजपा नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मंगळवारी, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी केले.
सेलू (जि.परभणी) येथील श्री बालाजी मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०८ हनुमान चालीसा पठण, महाआरती, महाप्रसाद आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.बोर्डीकर बोलत होते.
व्यासपीठावर सेलू बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर वाघीकर, माजी जिप सभापती अशोक काकडे, प्रसाद खारकर, दिनकर वाघ, रवि डासाळकर, एकनाथराव देशमुख, शिवहारी शेवाळे, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, संदीप घुगे, ज्योती मोगल, संध्या चिटणीस आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री व्यंकटेश बालाजी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हनुमान चालीसा पठण करण्याऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना बोर्डीकर पुढे म्हणाले की, समाधान व शांती मिळवायची असेल तर अध्यात्माची सांगड व संत महात्म्यांचा सहवास जीवनात असणे अत्यंत आवश्यक आहे.
श्री.बोर्डीकर म्हणाले की, आगामी सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी २६ उमेदवार आणि एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे. परंतु विविध स्तरातील प्रभावी व्यक्तीसह सर्व घटकांचा सर्वसमावेशक विचार करूनच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची निवड निश्चित करण्यात येईल. या करिता पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुकांशी चर्चा केली जाणार आहे.
यावेळी सभापती डॉ.रोडगे, श्री.काकडे, श्री.बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आनंद मालाणी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री.बोर्डीकर यांचा सत्कार केला. यानिमित्ताने श्री. बोर्डीकर यांनी उपस्थित नागरिकांशी हितगुज साधत विविध प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.

अशोक अंभुरे, कपिल फुलारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष गणेश काटकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, सुरेंद्र तोष्णीवाल, रामेश्वर राठी, महेशराव खारकर, संतोष सोमाणी आदींसह व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,506
Please Share
Previous Post

संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

Next Post

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

शालेय परिपाठातून मूल्यांची रूजवणूक : डॉ.गणेश शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ