देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 4, 2025
in मराठवाडा
0
परभणीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचा दिव्यांगांना आत्मविश्वासाने प्रगती करण्याचा संदेश

परभणी‌ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परभणी शहरात काढण्यात आलेली प्रभात फेरी उत्साहात पार पडली.प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात ‘सक्षम परभणी जिल्हा दिव्यांग पोर्टल’ चा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाला. दिव्यांगत्व हा अडथळा नसून ती शक्ती, ज्ञान आणि क्षमता आहे. दिव्यांगांनी स्वतःला कमी न समजता आपल्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने प्रगती करावी, असा संदेश दिला.
दिव्यांग कल्याणाच्या दिशेने जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम डिजिटल सुविधाकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या पोर्टलमुळे दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन अर्ज, अर्ज स्थिती तपासणी आणि बहुस्तरीय पडताळणी यांसारख्या सुविधा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत. परिणामी, लाभार्थ्यांना वारंवार सरकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. जीवनात खऱ्या अर्थाने सुलभता येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी युडीआयडी कार्ड काढणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगांच्या विरोधात होणाऱ्या छळ, हिंसाचार व शोषणापासून संरक्षण देण्यात आले आहे. कायद्याचा दुरुपयोग न करता दिव्यांगांच्या प्रती सौजन्याची वागणूक असावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी सक्षम पोर्टलमुळे दिव्यांग सेवांमध्ये पारदर्शकता आणि गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

Post Views: 37
Please Share
Previous Post

श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण

Next Post

श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात

श्रीकेशवराजांचा पालखी सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ