देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 22, 2025
in परभणी
0
सभापतीपदी डॉ.संजय रोडगे
Please Share

सेलू बाजार समिती : अकरा विरूद्ध सहा मतांनी निवड, सोमवारी पार पडली प्रक्रिया, जल्लोषात मिरवणूक

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

सेलू जि.परभणी : स्वातंत्र्यपूर्व काळात १९३१ मध्ये अस्तित्वात आलेल्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ व्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे डॉ.संजय रामराव रोडगे यांची ११ विरुद्ध ६ मतांनी निवड झाली आहे. निवडीनंतर बाजार समितीपासून डॉ.रोडगे यांची जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ.रोडगे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
बाजार समितीचे तत्कालीन सभापती चक्रधर पौळ यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता. त्यामुळे सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, ११.१५ वाजता अर्जांची छाननी झाली आणि १२ वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. डॉ.रोडगे आणि नामदेव डख हे दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण १८ पैकी १७ संचालक मतदानासाठी उपस्थित होते, तर चक्रधर पौळ गैरहजर राहिले. नवीन सभापती डॉ.रोडगे यांच्या निवडीसाठी ११ संचालकांनी मतदान केले. यामध्ये अनिल पवार, प्रसाद डासाळकर, अनिता ताठे, वर्षा सोळंके, शैलेश तोष्णीवाल, अनिल बरडे, रामेश्वर राठी, ॲड. दत्ता कदम, गोकर्णा पडघन, आणि डॉ. संजय रोडगे यांचा समावेश होता. तर प्रतिस्पर्धी उमेदवार नामदेव डख यांना ६ मते मिळाली. त्यांना गोरख भालेराव, राजेंद्र लहाने, पुरुषोत्तम पावडे, प्रकाश मुळे, गणेश आकात, आणि नामदेव डख यांनी मतदान केले. प्रशासकीय अधिकारी संदीप तायडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. या निवडीबद्दल विविध स्तरांतून डॉ.रोडगे यांचे अभिनंदन होत आहे.

बाजार समितीला लाभले उच्चविद्याविभूषित सभापती

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३१ मध्ये अस्तित्वात आलेल्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीला डॉ. संजय रोडगे यांच्या रूपात १४ वे सभापती मिळाले आहेत. डॉ,रोडगे हे उच्चविद्याविभूषित असून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनवीन शैक्षणिक प्रयोग, प्रकल्प, उपक्रमाव्दारे सेलू आणि परिसराला शैक्षणिक हब म्हणून विकसित करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरूच असते. त्यांच्या आधी १३ सभापतींनी बाजार समितीचा कारभार पाहिला आहे. यामध्ये रंगनाथ पाटील, आबा झोडगावकर, रावसाहेब वाघ, विठ्ठलराव वाघ, दत्तराव मोगल, रविंद्र डासाळकर, दिनकर वाघ, मुख्य प्रशासक मंगेश सुरवसे, माधव यादव, विनायक पावडे, रणजीत गजमल, संजय अब्दागीरे, संतोष काळे आणि चक्रधर पौळ यांचा समावेश आहे.

Post Views: 1,400
Please Share
Previous Post

सतीश जाधव यांना समाजभूषण पुरस्कार

Next Post

पत्रकारांवरील हल्ल्याचा सेलूत निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पत्रकारांवरील हल्ल्याचा सेलूत निषेध

पत्रकारांवरील हल्ल्याचा सेलूत निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ