देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
in वाशिम
0
क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान
Please Share

वाशिम भाजपकडून कार्यक्रमाचे आयोजन

वाशिम : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अमर क्रांतीवीरांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, वाशिम शहर यांच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देत स्वर्गीय राजू रामकृष्ण हंबीर, स्वर्गीय गणेश किशोर निंबेकर, स्वर्गीय नरेंद्रजी नारायणदास शर्मा, स्वर्गीय प्रकाश तुकाराम परळकर आणि स्वर्गीय विनायक मनोहर साने यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिजनांशी आत्मीय संवाद साधण्यात आला. यावेळी शहराच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जुनी नगरपरिषद, वाशिम येथील स्वातंत्र्यसेनानी स्मारकास अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, तसेच भावी पिढ्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या सर्व उपक्रमांमध्ये नगराध्यक्ष अनिल केंदळे, भाजपा पदाधिकारी, महिला व पुरुष मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.“क्रांतीवीरांचे बलिदान हीच आपल्या स्वातंत्र्याची अमूल्य ठेव आहे; त्यांच्या त्यागाचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच राष्ट्रभक्तीची खरी भावना आहे,” या विचारातून वाशिम भाजपने क्रांती दिनाला कृतज्ञता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा भावपूर्ण स्पर्श दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहराध्यक्ष मनीष मंत्री, शहर संयोजक बजरंग आळणे, संतोष लकरस आणि पंकज काशीकर महाराज यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,508
Please Share
Previous Post

श्री अमरनाथ भक्तमंडळाच्या महाप्रसादाला हजारो भाविक

Next Post

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

शेलूबाजार येथील मंदिराची रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील श्री साई श्रद्धा...

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

'पॉश' कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई वाशिम (फुलचंद भगत) : कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम,...

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

राज्यात अमरावती विभाग प्रथम; वाशिम जिल्ह्याचीही दमदार कामगिरी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

माविमच्या राज्यस्तरीय बैठकीत वाशिम जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत...

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

​मानोरा पोलिसांची धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी गजाआड ​वाशिम : पो.स्टे. मानोरा हद्दीतील पारवा व देऊरवाडी येथील बकरी चोरीप्रकरणी पोलिसांनी चार...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ