देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 9, 2026
in परभणी
0
मंजू दर्डा यांना राष्ट्रीय दामिनी पुरस्कार
Please Share

गंगाखेड (अनिल साळवे) : गंगाखेड शहरातील नवा मोंढा परिसरातील भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या मंजू दर्डा यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय दामिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि निःस्वार्थ कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १५ मार्च रोजी नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते मंजू दर्डा यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मंजू दर्डा या मागील अनेक वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित, दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून विविध आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजूंना वस्त्र व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, तसेच दिव्यांगांसाठी सहाय्यक साधनांचे वितरण असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.याशिवाय महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महिला सक्षमीकरण, संस्कृती संरक्षण आणि सामाजिक मूल्ये या विषयांवर त्या सातत्याने प्रबोधनात्मक कार्य करत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत झाली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय दामिनी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने गंगाखेड शहरासह संपूर्ण परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच शहरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, विविध सामाजिक संस्था तसेच पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंजू दर्डा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे गंगाखेड परिसरातील सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Post Views: 1,777
Please Share
Previous Post

सेलूतील महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान

नूतन विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ