कुपटा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
परभणी : येथील डाॅ. विद्या व डाॅ. गोपाळकृष्ण रावसाहेब सोळंके यांचा मुलगा ध्रुव याने रि-नीट २०२६ मध्ये तब्बल ६५५ गुण घेवून चांगला रँक मिळवला आहे. सोळंके कुटुंबाची मोठी मुलगीही अंशुली हीसुद्धा एमबीबीएस द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ध्रुवच्या या यशाचे कौतुक कुपटा (ता.सेलू) येथील समस्त गावकऱ्यांकडून होत आहे. राहुलदेव सोळंके, नारायणराव सोळंके, सतीशदादा सोळंके,, बाबासाहेब काळदाते, परमेश्वर घाटगे पाटील तसेच उद्योजक पवनराजे डोणगावकर, अविनाश चाटोरीकर यांनी ध्रुवच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.





