विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव
सेलू : शिक्षक दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शनिवारी, पाच सप्टेंबर रोजी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय रोडगे होते. प्रमुख उपस्थिती भरतकुमार लाड, गिरी, सविता रोडगे, महादेव साबळे, अशोक बोडखे, कैलास ताठे, शालिनी शेळके, मीनाक्षी रत्नपारखी, सुबोध हिवराळे, अनिल कुमार, अब्दुल बाशा, बबन सोनवणे, हरिभाऊ कांबळे, राजेंद्र जाधव आणि महेश कोल्हे यांची होती.
मार्गदर्शन करताना संजय रोडगे म्हणाले की, आजचा शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून ते विकसित करणारा आणि भविष्यासाठी सक्षम करणारा मार्गदर्शक असला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात शिक्षकांनी पारंपरिक अध्यापनापलीकडे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल साधने आणि स्मार्ट क्लासरूम तंत्रज्ञान आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे माहिती मुबलक असली, तरी त्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.
प्रमुख पाहुणे भरतकुमार लाड यांनी शिक्षकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा किंवा चुकीच्या समजुती वाढू न देता प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि वैज्ञानिक वृत्ती रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले. सोहळ्यात विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर टाके व कल्पना भाबट यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप आकात यांनी मानले. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक व कर्मचारी : आदर्श शिक्षक पुरस्कार : रेखा नांगरे, बाजीराव मोगल, वैभव शिकारे, गौतम इंगोले, विजय मैफल, कालींदा पवार, राजश्री वानरे, धुमाळ, भगवान शीरसागर, भागवत थोरात, बेस्ट ॲक्टिव्हिटी टीचर पुरस्कार : अंजली कलुंदिया, रविशंकर, विनायक थिटे, सारिका ताठे, भागवत घुगे, ढाले, विजय धापसे, इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार : मानसी यादव, मोहम्मद शोएब, एक्सलन्स इन क्लासरूम मॅनेजमेंट पुरस्कार : स्वाती कदम, जया माधुरी, स्टुडंट मेंटर पुरस्कार : रीना ठाकूर, मिताली ढाले, विषयतज्ज्ञ पुरस्कार : आकाश ठाकर, अमोल भुजबळ, महादेव खोसे, साधना मस्के, आदित्य पवार, लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड : मीरा मिरिंडा, यंग टीचर अवॉर्ड : कुसुम ताठे, हनुमान मस्के, अनिता पवार, बेस्ट डेब्यू टीचर अवॉर्ड : संगीता शेटी, सायली कोकड, मनिषा थिटे, सपोर्टिव्ह स्टाफ पुरस्कार : उमान शेख, बालाजी बामणे, काशिनाथ सोळंके, गणेश सोनार, बेस्ट टेक्नोसेव्ही पुरस्कार : राजेंद्र देशमुख, रिसर्च अँड पब्लिकेशन पुरस्कार : महेश कोल्हे





